Saturday, January 14, 2012

Ladakh Blossoms- A photoblog

Quantcast The region of Ladakh, near the northern borders of India, is a very special one. Hardly any geographical features of the Indian subcontinent, are visible here.The entire region is enclosed by towering snow clad mountains, which do not seem to have  any vegetation at all. Except for the mighty peaks and the regions, which are above the snow line and covered with snow round the year, all other mountain ranges lie bare and naked, except for the winter months, without any greenery at all. Yet, when you watch these mountains closely there are shades and shades of colours, given by the presence of the mineral salts on the mountain slopes. Mossy green, blackish purple, reddish orange and sulfurous yellow are some of the common shades. Near the famous monastery of Lamayuru, a huge area looks like the surface of the moon and has been aptly named as Moonland. The Ladakh mountains, with their specialized colours and distinguished looks, are so awe inspiring that one does not miss at all, the total absence of vegetation.
Yet, these bare and naked mountain slopes, during summer, are swarming and teeming with very short shrubs and bushes, which spread along the ground because of the blizzard like strong winds. For this reason only, the bushes here have very small leaves. During summer, the bushes bloom and blossom with blue, pink and red flowers of stunning beauty. In local Ladakhi language the bushes are known by the colours of the flowers. We therefore have 'Sakalzang-mentok, Kalzang-mentok, (Blue flower bush) Sulu-Mentok(Pink flower bush), Tesma-Mentok (Pale purple flower bush), Luku-Mentok (Yellow flower bush).
I am not aware of the names given to these bushes by the botanists. But I like for sure, the way Ladakhi people call these.
भारताच्या उत्तर सीमेवर असलेला लडाख हा प्रदेश मोठा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय उपखंडातील कोणतीही भौगोलिक वैशिष्ट्ये येथे दिसतच नाहीत. हा प्रदेश महाविशाल व महाकाय अशा पर्वतराजींनी पूर्णपणे वेढलेला असला तरी या पर्वतांवर झाडे झुडपे अभावानेच दिसतात किंवा दिसतच नाहीत. या पर्वतांच्यापैकी जी पर्वत शिखरे, हिम रेषेच्या वरच्या उंचीवर आहेत, त्यांच्यावर बाराही महिने पांढरे शुभ्र हिम पडलेले दिसते. ते सोडले तर बाकी सर्व पर्वतरांगा, उघड्या व बोडक्या दिसतात. मात्र बारकाईने बघितले तर प्रत्येक पर्वतावर एका निराळ्याच रंगाची छटा दिसून येते. हिरवट शेवाळी, जांभ्या दगडासारखा जांभळा, लालसर किंवा नारिंगी छटा असलेला आणि लामायुरू जवळ असलेला व चांद्रभूमी या नावाने ओळखला जाणारा पिवळट पर्वत हे सगळे एवढे खास व वैशिष्ट्यपूर्ण दिसतात की त्यांच्या माथ्यांवर वृक्ष झाडे दिसत नाहीत यात काहीतरी चुकल्यासारखे दिसते आहे असे वाटतच नाही.
या अशा डोंगर उतारांच्यावर, खुरटी, बारीक पानांची, अनेक झुडपे जवळ जाऊन बघितले की दिसू लागतात. उन्हाळ्यात या झुडपांच्या आणखी जवळ जाऊन बघितले की निळी, गुलाबी, लाल अशी अनेक रानफुले या झुडपांवर फुललेली दिसू लागतात. इथल्या लडाखी भाषेत, यांना sakalzang-mentok,kalzang-mentok, कालझान्ग मेंटॉक (निळ्या फुलाचे), sulu-mentok, सुलू मेंटॉक (गुलाबी फुलांचे) ,tesma-mentok, टेस्मा मेंटॉक( फिक्या जांभळ्या फुलाचे) luku-mentok, लुकू मेंटॉक(पिवळ्या फुलाचे) झुडुप असेच म्हटले जाते. वनस्पतीशास्त्रज्ञांनी त्यांच्या परिभाषेत या फुलझाडांना काय नावे दिली आहेत? ते मला माहित नाही. पण लडाखी भाषेप्रमाणे मी त्यांना निळ्या फुलाची, पिवळ्या फुलाची असेच म्हणणे जास्त पसंत करीन यात शंकाच नाही.


 

या वालुकामय पर्वतांच्या उतारांच्यावर, बुर्टसे (Burtse) या नावाचे एक झुडूप आढळते. या झुडपाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी बर्फाच्छादित परिस्थितींमधे सुद्धा या झुडपाच्या वाळलेल्या फांद्या चटकन पेट घेतात व त्यांची कॅलॉरिफिक व्हॅल्यू इतकी अधिक असते की गिर्यारोहक व स्थानिक या झुडपाला पेटवून त्यावर अन्न शिजवू शकतात. आमच्या वाहनाच्या चालकाला मी या झुडपाबद्दल विचारले असताना त्याने जे झुडूप मला दाखवले त्याला मोठी छान निळी फुले आलेली दिसली. आता निळ्या फुलांनी फुललेले हेच ते बुर्टसे झुडूप नक्की आहे का? हे काही मला सांगता येणार नाही हे मात्र खरे!

मात्र या उघड्या बागड्या वालुकामय वाळवंटी पर्वत उतारांवरून तळाला असलेल्या दर्‍यांच्या पर्यंत आपण पोचलो की चित्र एकदम पालटून जाते. हिरव्यागार पर्णसंपदेने नटलेली पॉपलर व विलो यांची उंच झाडे, हिरवीगार शेते, मधूनच दिसणारी व पिवळ्या धम्मक फुलांनी फुललेली मोहरीची शेते व त्यातून खळखळ वाहणारे निर्झर हे सगळे पाहून, थोड्या काळापूर्वी आपण एका वाळवंटी पर्वत उतारावर होतो याची आठवणही मनाला होणे कठिण बनते. इतका मोहक व सुंदर निसर्ग या वाळवंटी दर्‍यांच्या तळाला आपले वैभव कसा उधळताना दिसतो आहे याचे एक प्रकारचे आश्चर्य मनाला वाटल्याशिवाय रहात नाही.या शेतांच्या बांधांच्यावर, घरांच्या, झोपड्यांच्या बाजूला, अनेक नितांत सुंदर फुले फुललेली दिसतात. गुलाब तर सदासर्वदा एखाद्या राजासारखा आपला दिमाख दाखवतच असतो पण त्याच्या जोडीला जोड असलेली इतरही अनेक फुले मनाला आल्हाद देत रहातात.लडाखचा फुलोरा मला जसा जमला तसा मी कॅमेर्‍याने टिपला. ही फुले प्रत्यक्षात बघताना मला जो अवर्णनीय आनंद मिळाला त्याचा काही हिस्सा तरी वाचकांच्या पर्यंत या छायाचित्रांतून पोचावा हीच इच्छा.
12 जुलै 2011

No comments:

Post a Comment