Sunday, January 1, 2012

A jump in to the future

On 31st December midnight, all nations on earth, welcomed the new year. However, they did not do it at the same time. As clock struck 12 midnight according to the local time of that nation, they went on celebrating new year with great fanfare, progressively from the nations in the east to nations in the west. According to Indian standard time, people in New Zealand were the first to celebrate it late afternoon. Whereas, people in Hawai islands, celebrated it this afternoon (1January) almost 22 hours later. 
The local time for each and every nation is roughly according to it's geographical position on the globe. If in our imagination, we divide the globe in 24 equal parts in east-west direction, the local time in each if these 24 segments would differ by 1 hour from the time in neighbouring segments. In reality, this does not happen. Because of some political, commercial or social reasons,  the local time is fixed in a different way from Geographical position. For example, China is a huge nation spread from India to Korea in east-west direction. So according to geography, it should have 4 standard times. However Chinese have only one standard time, which is Beijing time. In the western regions of China, the geographical time is almost same as Pakistan or India. Yet, when the geographical time is about 3 AM, the clocks in Xinjiang, show 6AM in the morning.काल म्हणजे 31 डिसेंबर 2011 ला, पृथ्वीवरच्या सर्व देशांमधल्या रहिवाशांनी नववर्षाचे स्वागत केले खरे पण ते काही एकाच वेळी केले नाही. प्रत्येक देशाच्या स्थानिक वेळेप्रमाणे, रात्रीचे 12, पूर्वेकडील देशांकडून पश्चिमेकडील देशांकडे, जसजसे वाजत गेले तसतसे त्या त्या देशातील लोकांनी जल्लोश करून नववर्षाचे स्वागत गेले. हे स्वागत न्यूझीलंड या देशातील लोकांनी भारतीय वेळेप्रमाणे काल दुपारी सर्वात प्रथम केले तर हवाई बेटांवरचे लोक हा लेख मी लिहितो आहे त्या वेळी म्हणजे न्यूझीलंडच्या तब्बल 22/23 तासानंतर करत आहेत.
प्रत्येक देशाची स्थानिक वेळ ही त्याच्या पृथ्वीवरील भौगोलिक स्थानाप्रमाणे साधारण असते. समजा आपण पृथ्वीगोलाचे पूर्व- पश्चिम दिशेत 24 काल्पनिक भाग केले तर या प्रत्येक भागातील रहिवाशांची स्थानिक वेळ, 1 तासाच्या फरकाने असेल हे सहज लक्षात येईल. प्रत्यक्षात तसे होत नाही. राजकीय किंवा सामाजिक कारणांनी ही स्थानिक वेळ पुष्कळ वेळा निराळीच ठरवली जाते. उदाहरणार्थ चीन हा देश, भारताच्या सीमेपासून ते पार कोरियाच्या सीमेपर्यंत पसरलेला आहे. खरे तर भौगोलिक कारणांनी चीन मध्ये, विभागांप्रमाणे 4 तरी प्रमाणित वेळा असण्याची गरज आहे. परंतु या सबंध देशात फक्त बिजिंगची वेळ ही प्रमाणित वेळ म्हणून पाळली जाते. शिंजियांग किंवा देशाच्या पश्चिम भागात साधारण भारतीय किंवा पाकिस्तानी भौगोलिक वेळ असते. त्यामुळे भारतीय वेळेप्रमाणे रात्रीचे 3 वाजलेले असले तरी शिंजियांग मधली घड्याळे सकाळचे 6 वाजलेले दाखवतात.
न्यूझीलंडच्या पूर्वेला आणि हवाई बेटांच्या पश्चिमेला रेखांशावर एक काल्पनिक रेषा आखलेली आहे. याला आंतराष्ट्रीय तारीख रेषा असे नाव आहे. या रेषेच्या पूर्वेकडचा भाग व पश्चिमेकडचा भाग यांच्यात 24 तास वेळेतला फरक असतो. प्रशांत महासागरावर ही रेषा येत असल्याने विमानातून अमेरिकेकडे जाताना आपण एकदम 24 तास मागे जातो किंवा अमेरिकेतून येताना 24 तास भविष्यात उडी घेतो. पण रोज हजारो प्रवासी घेत असलेल्या या उडीबद्दल मी लिहित नसून या रेषेला लागून असलेल्या सामोआ या बेटावरील शासन आणि रहिवाशांबद्दल लिहितो आहे. हे सामोआ बेट आणि त्याच्या उत्तरेला असलेले टोकेलाऊ हे बेट ही दोन्ही बेटे प्रशांत महासागरात फिजी बेटाच्या बरोबर उत्तरेला आणि न्यूझीलंड व हवाई बेटांना जोडणारी एखादी रेषा कल्पली तर त्या रेषेच्या मध्यावर येतात. सामोआचे अक्षांश रेखांश आहेत (13S,172W) तर टोकेलाऊचे (9S,171W)!
गेली 119 वर्षे ही दोन्ही बेटे जगातील सर्वात पश्चिमेकडचे देश म्हणून मानले जात. नववर्ष साहजिकच या दोन्ही ठिकाणी सर्वात शेवटी येत असे. या समोआ बेटाची लोकसंख्या आहे 180000 लोक. परंतु या सामोआ वंशाचे 130000 लोक न्यूझीलंडचे रहिवाशी असल्याने न्युझीलंड बरोबर सामोआचे भावनिक, कौटुंबिक व व्यापारी पातळीवरचे अतिशय निकटचे संबंध आहेत. न्यूझीलंड आणि सामोआ याच्यातील वेळेचा फरक 23 तास असल्याने लोकांना एकमेकाशी संबंध ठेवणे जिकिरीचे होते. सामोआत शुक्रवार असतो तेंव्हा न्यूझीलंडमध्ये शनिवार असल्याने सुट्टी असते तर सामोआ रवीवारची सुट्टी घेतो तेंव्हा न्यूझीलंडमधे सोमवारचे काम चालू झालेले असते.

सामोआ हे न्यूझीलंडच्या लोकांचे एक आवडीचे पर्यटन स्थळ आहे तर सामोआचा ऑस्ट्रेलियाशी बराच व्यापार आहे. या सगळ्या कारणांमुळे सामोआच्या शासनाने 29 डिसेंबर नंतर एकदम 31 डिसेंबर तारीख येईल असे घोषित करून टाकले व या वर्षीचा नववर्षदिन जगात प्रथम सामोआ मध्ये उगवला आहे.
लोकांना हा बदल पसंत पडला आहे असे तिथल्या शासनाचे म्हणणे आहे. लोकांच्या सोईप्रमाणे काळ-वेळ बदलण्याची ही पद्धत मला आवडली. भारतात सुद्धा एकच प्रमाणित स्थानिक वेळ न ठेवता 3 प्रमाणित वेळा ठेवल्या तर घड्याळ्यातील वेळ व भौगोलिक वेळा या एकमेकाशी जुळतील व लोकांना सोईचे जाईल असे मला वाटते. आसाम मध्ये हिवाळ्यात दुपारी दोन अडीच वाजता रात्र सुरू होत असते. हा विचित्रपणा अशा तीन प्रमाणित वेळा ठरवल्या तर सहज दूर करता येणे शक्य आहे.
1 जानेवारी 2012

No comments:

Post a Comment