Tuesday, January 10, 2012

Donkeys of Bengaluru

During my childhood days, most of the roads in my home town Pune, were never metalled and were very dusty. Occasionally, whenever any motor vehicle would pass through, it would raise a huge cloud of dust. Yet, there were few occasions, when I felt that the dust cloud created by a passing motor vehicle was just a small aberration of the beautiful and clean environment of my lovely old Pune. This major catastrophe would come about very suddenly, when I would be cycling on the road. A giant dust storm would suddenly appear on the horizon with sounds like "Zyack, Zyack" being heard. It was always an act of prudence to get down from the bicycle and wait patiently on a road side. Within a minute, a running squad of fifty or sixty donkeys associated with their care taker donkey-boys would pass me and after another couple of minutes, when the dust was settled, I could brush off the excess dust on my clothes and proceed further. All those donkeys would be loaded with construction materials like sand, crushed stones, bricks or excavated earth. For construction industry of those days, donkeys were the chief mode of transport and not the trucks or three wheelers of today. Later it became uneconomic to use donkeys for transportation and these four or three wheelers took their place.माझ्या लहानपणी पुण्यातले बरेच रस्ते डांबरीकरण न झालेलेच होते. या रस्त्याने जेंव्हा केंव्हा एखादे मोटर गाडी सारखे वाहन जात असे तेंव्हा ते भरपूर धुरळा अडवत जात असे. असे असले तरी मोटर गाडीने उडवलेला धुरळा काहीच नाही, असे म्हणण्याची कधी कधी वेळ येत असे. सायकलवरून जात असताना अचानक रस्त्यावर पुढे प्रचंड धुरळा उडलेला दिसू लागे. झ्याक, झ्याक असा पुकाराही ऐकू .येऊ लागे. अशा वेळी सायकलवरून उतरून बाजूला स्वस्थ उभे राहणे हेच मोठे शहाणपणाचे ठरत असे. एखाद्या मिनिटभरात तुमच्या समोरून पन्नास ते साठ गाढवे व त्यांच्या बरोबर धावणारी वडार पोरे दिसत असत. या गाढवांवर वाळू, विटा, किंवा खणून काढलेले डबर या पैकी काहीही लादलेले असे. बांधकाम उद्योगासाठी, गाढवे हीच त्या वेळी प्रमुख वाहतुक व्यवस्था होती. ट्रक किंवा टेंपो असले प्रकार तेंव्हा नसत. पुढे ही गाढवे सांभाळणे परवडेनासे झाले आणि मग ट्रक व टेंपो आले.

पुण्यातून गाढवे गायब झाली असली तरी बेंगलुरू मध्ये ती अजुनही आहेत हे परवा कोठेतरी वाचले आणि लहानपणच्या त्या गाढवांच्या तांड्यांची एकदम आठवण झाली. मात्र बेंगलुरू मधल्या आजच्या गाढवांना आता प्रमोशन मिळाले आहे. ती बांधकाम साहित्याची वाहतुक आता करत नाहीत. बेंगलुरू मधले धोबी आता धोबी घाटावरून कपड्यांची ने आण करण्यास या गाढवांचा वापर तर करतातच पण या शिवाय त्यांचा उपयोग आता दुसर्‍याही अनेक गोष्टींसाठी होऊ लागला आहे. बेंगलुरूच्या धोब्यांकडे 250 गाढवे तरी या कपड्यांची ने-आण करण्यासाठी आजमितीला आहेत.
गाढविणीचे दूध हे लहान मुलांचा खोकला व घशांचे विकार यावर गुणकारी असते असा समज आहे. या शिवाय काही स्त्रिया आपल्या प्रसाधनात या दुधाचा वापर करतात. इजिप्तची राणी क्लिओपात्रा गाढविणीच्या दुधात रोज आंघोळ करत असे म्हणतात. बेंगलुरू मधल्या आजच्या काही स्त्रिया अगदी स्नान जरी करत नसल्या तरी चेहरा मात्र या दुधाने धूत असतात. गाढवे पाळणारे धोबीच या गाढविणीच्या दुधाची विक्री करत असतात. मात्र या दुधाचा भाव ऐकला तर बहुतेकांच्या तोंडचे पाणीच पळेल. हे दूध 250 रुपयांना 100मि.ली. किंवा 2500 रुपये प्रति लिटर या भावाने विकले जाते. काही मंडळींना गाढवाचे मटन, यात असलेली कमी चरबी व जास्त प्रोटीन्स, यामुळे पसंत असते. काही गाढवे या उपयोगासाठीही पाळली जातात.
गाढवांचे आणखी एक/ दोन उपयोग, बेंगलुरूमध्ये लोकप्रिय आहेत. गाढवे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी बर्‍याच वेळा वापरली जातात. गाढवांचा डेली रेट 2000 रुपयांच्या वर सध्या आहे. या शिवाय बेंगलुरूच्या विधान सौधावर राजकीय निदर्शने करताना गाढवांचा वापर करणे राजकीय पक्षांना बरेच आवडते असे दिसते कारण ही गाढवे मधून मधून विधान सौधासमोर दिसत असतात.
गाढवांचा एकूण वापर व मर्यादित संख्या यामुळे गाढवांच्या चोर्‍याही अलीकडे होऊ लागल्या आहेत. एका गाढवाची किंमत 15000 ते 20000 तरी असते. यामुळे या धोबी मंडळींना आपल्या गाढवांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते.
महाराष्ट्रात आणि विशेषत: पुण्यात आता निवडणुकींची धामधुम आहे. बेंगलुरू वरून स्फुर्ती घेऊन कोणी पुण्यात परत गाढवे आणणार नाही अशी आशा आपण करूया.
10 जानेवारी 2012

2 comments:

  1. गाढविणीच्या दुधातील सी-केसीन या घटकामुळे हे दूध पचावयास सोपे असते. पण या घटकामुळेच हे दूध लवकर खराबही होते.

    ReplyDelete
  2. Sharayu-

    माहितीबद्दल धन्यवाद

    ReplyDelete