Saturday, December 31, 2011

On Air Travel

Quantcast Last week, I had a chance to make a journey by air to New Delhi on a domestic flight. It has been years since I had traveled by air on a domestic flight within India. In fact my last trip to New Delhi was at least 30 years back. It was natural for me to wonder at the change that has taken place in aviation sector in India. We were supposed to take off from Pune airport around 11.30 AM. I had in my mind the old airport of Pune, when I reached there. In old days this airport was very small with only a flight or two landing there. That too was the old DC3 or Dakota aircraft belonging to the Government airline as there were no private airlines in those days. The Pune airport of today was a real shocker.I could not believe that there were at least seven or eight hundred people on the airport, waiting to go some where. When I reached the departure hall, I saw at least 4 or 5 big jet aircraft waiting on the tarmac. Out of these, three aircraft belonging to different airlines, were supposed to leave for new Delhi only, one after the other. All this was beyond my wildest imagination. I checked the departures board. There were 11 flights leaving for Delhi every day, which meant that at least 2000 to 2500 passengers traveled to New Delhi from Pune each day by air. Looking at the crowd, who were waiting for my flight, the fact could be confirmed.  मागच्या आठवड्यात विमानाने दिल्लीला जाण्याचा योग आला. खूप वर्षात विमानाने भारतामधे प्रवास केला नव्हता. दिल्लीला तर मागच्या तीस वर्षांत गेल्याचे आठवत नाही. त्यामुळे सगळेच नवीन होते. अगदी पुण्याच्या विमानतळापासून. आमचे विमान सकाळी साडे अकराच्या सुमारास सुटणार होते. माझा जुना अनुभव लक्षात होता. त्या वेळेस पुण्याचा विमानतळ म्हणजे अगदी छोटासा होता. एका वेळी जेमतेम एखादे विमान विमानतळावर येऊन उभे रहात असे आणि तेही इंडियन एअरलाइन्सचे डाकोटा किंवा DC3 विमान. दुसरी कोणतीही विमान सेवा देणारी कंपनीच तेंव्हा नव्हती. विमानतळावर गेल्यावर तिथली गर्दी बघून धक्काच बसला. सात आठशे माणसे तरी कोठेतरी निघालेली होती. आत गेल्यावर लक्षात आले की समोर चार किंवा पाच विमाने थांबलेली आहेत. ती सुद्धा मोठी जेट विमाने. त्यातली तीन विमाने तर दिल्लीलाच निघणार होती. तीन विमान कंपन्यांची दिल्लीला जाणारी विमाने दहा पंधरा मिनिटाच्या फरकाने आता दिल्ली कडे जाणार होती. हे सगळे माझ्या कल्पनेच्या आवाक्याच्या बाहेरचे वाटते होते. मग तिथला एक बोर्ड बघितला. त्या बोर्ड प्रमाणे रोज दिल्लीला जाण्यासाठी 11 विमान सेवा होत्या. म्हणजे 1500 ते 2000 प्रवासी रोज पुण्याहून दिल्लीला जाऊ शकत होते. आमच्या फ्लाईटला असलेली गर्दी बघून एवढी मंडळी रोज दिल्लीला जात असणारच याची खात्रीच पटली.
विमानाचे तिकिट मी जालावरून काढले होते. त्याचे फारसे अप्रूप मला नव्हते कारण परदेश प्रवासाची तिकिटे मी जालावरून काढतोच. परंतु आश्चर्य वाटले ते एका नव्या प्रकारच्या संकेत स्थळांचे किंवा वेब साईट्सचे. सिंगापूर एअरलाईन किंवा सिल्क एअर यासारख्या विमान कंपन्यांच्या संकेतस्थळांवर जाऊन तिकिट काढणे हे माझ्या परिचयाचे होते. पण आता या नवीन संकेतस्थळांवर कोणत्याही विमान कंपनीच्या विमान सेवेचे तिकिट काढता येते. त्यांचे दर आता पूर्वीसारखे फिक्स पण नसतात व ते सारखे बदलत राहतात. शोधाशोध करून स्वस्त फ्लाईट मिळू शकते हा सगळा प्रकार मला नवीनच होता.
1960 किंवा 1970 च्या दशकात केलेले विमान प्रवास मला अजून आठवतात. तिकिट काढण्यासाठी विमान कंपन्यांच्या ऑफिस मधे जाणे मग ती लांबलचक अनेक पाने असलेली तिकिटे, त्याच्या बरोबर एखादे प्लॅस्टिक फोल्डर मिळत असे. ते घ्यायचे. ते तिकिट जपून ठेवायचे कारण ते दाखवल्याशिवाय तुम्हाला चेक इन करता येत नसे. तिकिटावरचे नाव आणि तुमचे नाव हे एक असलेच पाहिजे असे नव्हते कारण तिकिटावर नाव असलेली व्यक्ती खरोखरच प्रवास करते आहे का ही माहिती करून घेण्याची विमान कंपन्यांना जरूरीही नसे व ते महत्वाचे पण नव्हते. अलीकडे तिकीट नसले तर एअरपोर्ट वर छापून मिळते पण तुमचे सरकारी ओळखपत्र नसले तर तुम्हाला विमानात प्रवेश मिळणे मुष्किलच. त्या वेळेला सुरक्षा जांच वगैरे प्रकारही नव्हते. सामानही कोणी तपासत नसे. अलीकडे सामान क्ष किरणांनी तपासल्याशिवाय पुढे जाणेही शक्य नाही. पुण्याचा विमानतळ म्हणून तेंव्हा वायुदलाचा एक हॅन्गर वापरात येत असे. प्रवाशाला पोचवायला आलेला कोणीही अगदी विमानाच्या थोड्या अलीकडे पर्यंत जाऊ शकत असे. मी बंगलुरुला रहात असताना माझे वडील मला एकदा भेटायला आले होते. त्यांच्या अगदी विमानापर्यंत त्यांना पोचवायला गेल्याचे मला आठवते. आता पोचवायला आलेल्या माणसाला इतक्या लांब अंतरावरूनच परत पाठवतात की विमानतळावर निरोप द्यायला जाण्यासारखा मूर्खपणा नसावा.
आमच्या दिल्लीच्या विमानफेरीत हवाई सुंदर्‍या होत्या पण खाणे पिणे वगैरे काही नव्हतेच त्यामुळे त्यांना फारसे काम पण नव्हते.विमानाची साफसफाई करताना त्याच दिसल्या. अगदी पिण्याचे पाणी हवे असले तरी ते अलीकडे विकत घ्यावे लागते. पूर्वी थंडगार तेलकट समोसे. लेमन किंवा चहा कॉफी , लेमनच्या गोळ्या, यू-डी कलोन वगैरे सारख्या मिळणार्‍या कोणत्याच गोष्टी आता मिळत नाहीत. विमानसेवेचे तिकिट काढल्यावर विमान कंपनी त्या स्थळावर तुम्हाला पोचवण्याची जबाबदारी घेते. बाकी तुमचे तुम्ही बघायचे. नशीब की आंतर्राष्ट्रीय विमान सेवांच्यात अजून जेवण खाण देतात. नाहीतर दहा बारा तास प्रवास करायचा पण खायला प्यायला विकत घ्यायचे हा प्रकार सुरू झाला नाहीये.
माझ्या एक परिचित महिला आहेत. स्वकष्टाने अगदी साधारण परिस्थितीतून वर आलेल्या. परवा त्या मला म्हणत होत्या की या सुट्टीत शिमला, मनालीची सफर करण्याचा बेत आहे पण मुलगा म्हणतो आहे की दर वेळेस आपण कोठेही जायचे असले की द्वितीय वर्गाने, फार फार तर शयन यान, प्रवास करतो. आता विमानाने जाऊया. मी आश्चर्याने थक्क झालो. पूर्वी विमान जवळून बघितले असलेल्यांची संख्या (आत बसण्याचे सोडूनच द्या.) नगण्य असे. आता सामान्य माणसे सुद्धा विमानाने जाण्याचे बेत करू लागली आहेत. भारत समृद्धीच्या मार्गाने नक्की वाटचाल करतो आहे याची ही एक खूण आहे नक्की. काही वर्षात रेल्वे स्टेशनसारखी गर्दी बहुदा विमानतळांच्यावर होऊ लागेल आणि ती तशी व्हायलाच पाहिजे आहे.
माझी दिल्लीची ट्रिप संपवून मी पुण्याच्या विमानतळावर उतरलो तेंव्हा रात्रीचे पावणे अकरा वाजले होते. विमानतळावर गर्दीचा महापूर होता कारण एका पाठोपाठ विमाने उतरत होती. बाहेर आल्यावर वाहतुक मुरंब्याने सर्व वाहतुक कोलमडली असल्याचे लक्षात आले. याच पुण्यात, रात्रीचे आठ वाजून गेल्यावर रस्त्याने जायला नको वाटे. लोहगावच्या आसपास तर भटकी कुत्री सुद्धा बहुदा फिरकत नसावीत. या भूतकालाची मला आठवण झाली आणि मोठी गंमत वाटली.
कालाय तस्मै नम: हेच खरे.
4 मार्च 2011

No comments:

Post a Comment