Monday, December 5, 2011

Examinee Bridegroom

During my college days, whenever I had to appear for any examination, I used to wear a particular shirt and a pair of trousers.I used believe then that I would be able to do well in that examination if I wore that particular set of clothes. If the examination continued over two or three days, I would be very much worried. Realizing my anxiety, my poor mother used to wash the clothes, dry them overnight and keep them ready after ironing just before my next day's examination. I very well knew that this was my superstition and had no logical base yet I never had the courage in those days to break the convention and test uncharted waters. 
Many students have such kind of stupid superstitions about appearing for examinations. Some of them are particular about writing the examination with a particular fountain pen, which they believe would get them good marks. Some think that praying at a particular temple, like SiddhiVinayaka temple in Mumbai, for few minutes would bring success to them. Our School teachers always told us to wear simple clothes while appearing for examinations. Their logic was that if one wears fancy or fashionable clothes at that time, others would look at them and this fact would make the students conscious about the clothes and would lessen their concentration on the examination. There was certainly some logic in this.
मी कॉलेजात असताना कोणत्याही परिक्षेला जायचे असले की एक विशिष्ट पॅन्ट व शर्ट घालून परिक्षेला जात असे. हे कपडे परिधान केले की आपल्याला आजचा पेपर छान जाणार अशी माझी खात्री असे. ओळीने दोन किंवा तीन दिवस परिक्षा असली की माझी पंचाईत व्हायची. बिचारी माझी आई मग रात्री ते कपडे धुवून वाळत टाकत असे व सकाळी इस्त्री करून मला देत असे. हा माझा अंधविश्वास आहे हे मलाही पटत असे पण विषाची परिक्षा कशाला घ्यायची म्हणून दुसरे कपडे घालण्याचे धैर्य मला होत नसे.
परीक्षेच्या बाबतीत माझ्यासारखा अंधविश्वास बर्‍याच जणांचा असतो. कोणाला एक विशिष्ट पेन वापरून पेपर लिहिला की चांगले मार्क मिळतात असा विश्वास असतो तर काही जणांना परिक्षेला जाण्यापूर्वी सिद्धीविनायकासारख्या एखाद्या देवळात जाऊन देवासमोर हात जोडून आल्यावाचून पेपर सोडवायला बसायला नको वाटते. परिक्षेला जाताना अगदी साधे कपडे घालावेत, लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले जाईल असे कपडे घालू नयेत असे आमच्या शाळेत सांगितलेले असे. उंची कपडे परिधान केले तर असे केल्याने लोक आपल्याकडे बघत आहेत हे आपल्या लक्षात येते व त्यामुळे पेपर सोडवण्याकडचे आपले लक्ष विचलित होते असे आमचे एक शिक्षक सांगत. अर्थात त्यात तथ्य नक्कीच होते.

आज एक बातमी वाचल्यावर मला या शाळेत सांगितलेल्या पथ्याची अचानक आठवण झाली. ही बातमी आहे दिनेश राजपूत या 24 वर्षाच्या एका युवकाची!. हा दिनेश पदवीधर असून, 1992 मध्ये त्याच्या वडीलांचे निधन झाल्यापासून, आपल्या भावाच्या कापडाच्या धंद्यात त्याला मदत करत असतो. अहमदाबाद मधल्या अमराईवाडी भागात असलेल्या भिलवाडा रस्त्यावर त्याचे घर आहे. या वर्षी गांधीनगर मधील डी केबिन, साबरमती येथे राहणार्‍या संगीता या युवतीबरोबर त्याचा विवाह ठरला. विवाहाची तारीख 4 डिसेंबर 2011 ही ठरली.
या दिनेश राजपूतला भावाच्या कापड धंद्यात काम करणे विशेष रुचत नव्हते. आपण सरकारी नोकरी केली पाहिजे असे त्याला नेहमी वाटत असे. गुजरात राज्य शासनाची एक जाहिरात मध्यंतरी त्याच्या पाहण्यात आली. तलाठी आणि मंत्री अशा पदासाठी ही जाहिरात होती. मात्र हे पद मिळवण्यासाठी एक परीक्षा देणे आवश्यक होते. दिनेशला ही नोकरी आवडल्याने त्याने आवेदनपत्र भरून पाठवून दिले. काही दिवसांपूर्वी त्याला या नोकरीच्या परिक्षेचे हॉल तिकीट आले. त्यावरची तारीख पाहून दिनेश अगदी हवालदील झाला. कारण ही परिक्षा त्याच्या विवाह दिनालाच म्हणजे 4 डिसेंबरलाच आयोजित केलेली होती.
दिनेशने ही संधी हातातून निसटू न देण्याचे ठरवले. घरातील इतर लोक लग्नाची तयारी करत असताना हा बाजूच्या एक खोलीत पुस्तकात डोके खुपसून बसलेला असे. तो म्हणतो की विवाहाच्या आदल्या दिवसांपर्यंत तो रोज 2 तास अभ्यास व रात्री उजळणी करत होता. त्याची परीक्षा दुपारी 4 वाजेपर्यंत तरी सुरू राहणार होती तर विवाह मुहुर्त संध्याकाळी 6 वाजतानाचा होता. आपल्याला मधे वेळ मिळणार नाही हे समजल्यावर दिनेश घाबरला नाही तर तो नवरदेवाचा साज चढवूनच इसानपूर भागातल्या समजुबा हाय स्कूल या आपल्या परिक्षेच्या ठिकाणी जायला निघाला. हळदीने पिवळे झालेले हातपाय, हातावर मेंदी काढलेली, अंगावर उंची व भारी कपडे, गळ्यात हार, कंबरेला खंजीर व परफ्यूमचा घमघमाट अशा जाम्यानिम्यानिशी दिनेशची स्वारी परिक्षा केंद्रावर आली तेंव्हा आजूबाजूची सर्व मंडळी मोठ्या कुतुहलाने व आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिली. दिनेशने कोणाकडेही लक्ष न देता आपला परिक्षेचा पेपर सोडवला. 4 वाजता परिक्षा संपल्यावर तो घरी गेला त्याने अंगात शेरवानी चढवली व घोड्यावर बसून तो डी केबिन कडे जाण्यासाठी वरातीतून निघाला. आपल्याला पेपर चांगला गेला असल्याने आपण नक्की पास होणार याची खात्री त्याला वाटते आहे.
परिक्षेला साधे कपडे घालून जा म्हणून सांगणार्‍या आमच्या शिक्षकांना दिनेशची गोष्ट समजली असती तर त्यांची काय प्रतिक्रिया आली असती? असा एक विचार मात्र माझ्या मनात ही दिनेशची गोष्ट वाचल्यावर आल्यावाचून राहिला नाही.
5 डिसेंबर 2011

2 comments:

  1. हा अंधविश्र्वास म्हणण्यापेक्षा आपल्या संकल्पाला बळ देण्याचा प्रयत्न म्हणणे योग्य होईल

    ReplyDelete
  2. शरयू-

    कदाचित तुम्ही म्हणता तसेही खरे असेल पण मी याला अंधविश्वास म्हणणेच पसंत करीन.

    ReplyDelete