Sunday, December 4, 2011

Kolaveri De – Why this murderous rage dear?



There is always an apprehension in media that sons and daughters of the Bollywood stars are introduced to stardom rather easily without any efforts or real slogging. This might be true to some extent, but the chances of this Gen-Next, coming out with a super hit, are also very high because of their pedigree. This fact was hammered home last week by daughters of two Tamil superstars Rajanikanth and Kamalhasan. Aishvarya Rajanikanth, daughter of superstar Rajnikanth is producing a Tamil film named as 'Three' and Shruti, daughter of superstar Kamalhasan has the female lead role in it. Aishwarya's husband Dhanush has the male lead in this film. The music for the film is being created by Aniruddha Ravichander, again a nephew of Kamalhasan.
All this star progeny, released a video of a recording session of one of the songs from the film on U tube on 16th November. The video was an instant hit and spread over internet like wild fire. The listeners were absolutely mesmerized and enchanted by the song and also by the video where film's female lead, Shruti also appears in just everyday clothes without any glamour. In next 5 days, 10000 people shared the song on facebook and during last fortnight U-Tube download crossed the figure of 10 million. This song became so popular and wide spread that even Wikipedia took note of it.
16 नोव्हेंबर 2011 ला तमिळ चित्रपट सृष्टीतील दोन बडे कलाकार रजनीकांत व कमलहसन यांच्या कन्यका ऐश्वर्या व श्रुती यांचा सहभाग असलेल्या 'थ्री' या तमिळ चित्रपटातील एक गाणे ध्वनीमुद्रित केले जात असतानाचा व्हिडिओ, यू-ट्यूब या संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात आला. सोसाट्याच्या वार्‍याने जशी आग काही क्षणात भडकावी तसा हा व्हिडिओ आंतरजालावर प्रसरत गेला व ऐकणार्‍यांना त्याचे वेड लागल्यासारखे झाले. पुढच्या 5 दिवसात हे गाणे 10000 लोकांनी फेसबूक वर शेअर केले. मागच्या दोन आठवड्यात य़ू-ट्यूबवरून हे गाणे ऐकणार्‍यांची संख्या 1 कोटीचा आकडा पार करून गेली. वावटळीसारख्या पसरलेल्या गाण्याची दखल विकिपिडिया ला सुद्धा घ्यावी लागली आहे.
आंतरजालावरच्या या झंझावाताबद्दल येणारे उल्लेख मी वाचत होतो. परंतु माझ्या संगणकाच्या ध्वनीमुद्रण कौशल्यात काहीतरी बिघाड झाल्याने मला ते गाणे काही ऐकता आले नव्हते. परवा रात्री साडेदहा वाजता एका बातम्या देणार्‍या टी.व्ही. वाहिनीवर हा व्हिडियो मी प्रथम ऐकला. हे गाणे तमिळ असले तरी त्यातले बहुतेक शब्द तमिळ ढंगाने उच्चारलेले इंग्रजी शब्द आहेत. ग्लास, व्हाइट, ब्लॅक या सारखे शब्द ज्या पद्धतीने उच्चारले आहेत ते लिहिणे खरोखरच कठिण आहे. ते प्रत्यक्षात ऐकायला पाहिजेत इंग्रजीत कदाचित glaaase, whaaite, blaacke असे हे उच्चार थोड्याफार प्रमाणात लिहिता येणे शक्य व्हावे. गाण्याला फारसा काही अर्थ आहे असे मला तरी ते ऐकून वाटले नाही. पण तो कार्यक्रम संपल्यावर त्या गाण्याची चाल माझ्या ओठावर आपोआप जाऊन बसली आहे हे माझ्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही. या गाण्याला दिलेले संगीत खरे तर त्याचा प्राण आहे. अतिशय सोपे पण हॉ न्टिंग असे संगीत या गाण्याचा संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर याने या गाण्याला दिले आहे. गाण्याचा ताल तर अफलातूनच आहे.


गाण्याचे शीर्षक कोलवेरि डी म्हणजे प्रिये! का हा जीवघेणा राग? असे असले तरी ते शीर्षक व गाण्यातील इतर शब्द यांचा कसा मेळ घालायचा ते मला तरी कळले नाही. पण जे काही रसायन या संगीत दिग्दर्शकाने बनवले आहे. व रजनीकांतचे जामात 'धानुष' यांनी गाऊन सादर केले आहे त्याने आंतरजालावर तर लोकांना वेड लावले आहेच पण चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही या गाण्याचे कौतुकच केले आहे. प्रेमामधे अयशस्वी ठरलेल्या एका तरूणाच्या तोंडी हे गाणे असल्याने त्यात एकूण वैफल्याचे बरेच स्वर आहेत. तरीही या गाण्याची चाल अशी अफलातून आहे की त्यात कोणतेही शब्द घातले तरी चालेल. आता हे गाणे कोणते उच्चांक मोडते ते पाहायचे.
एक गोष्ट मात्र सत्य आहे की गेले दोन दिवस मी हेच गाणे गुणगुणतो आहे. प्रिये! का हा जीवघेणा राग?, कोलवरि डी?
4 डिसेंबर 2011

No comments:

Post a Comment